Ads

Tuesday, March 1, 2022

IPL 2022 : सुरेश रैनाची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री! जाणून घ्या Viral Photo मागील सत्य

 

IPL 2022 : सुरेश रैनाची गुजरात टायटन्समध्ये एन्ट्री! जाणून घ्या Viral Photo मागील सत्य


सुरेश रैनाचा (Suresh Raina) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on social media) होत आहे. या फोटोत रैना गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसत असून त्याची आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री होणार आहे, असा दावा केला जात आहे.


मुंबई, 2 मार्च : आयपीएलमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेला सुरेश रैना (Suresh Raina) यंदाच्या ऑक्शनध्ये (IPL Auction 2022) अनसोल्ड होता. रैनाला या सिझनपूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मुक्त केले होते. त्यानंतर त्याला चेन्नईसह एकाही आयपीएल टीमनं खरेदी केले नाही. सध्या रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral  on social media) होत आहे. या फोटोत रैना गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसत असून त्याची आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री होणार आहे, असा दावा केला जात आहे.

गुजरातचा ओपनिंग बॅटर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमधून नाव मागं घेतलं आहे. त्यामुळे रॉयच्या जागी रैनाचा समावेश होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच क्रिकेट फॅन्सनी टायटन्सच्या जर्सीमध्ये रैनाचा फोटो एडिट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

No comments:

Post a Comment

How to make sooji halwa at home